ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण महायोजना दूत या पदासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत . ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची सर्व माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

महा योजनादूत या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  • आधार कार्ड
  • आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक असावा
  • पदवी प्रमाणपत्र
  • संगणक प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर

वरील कागदपत्रे ही तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी लागणार आहेत.

ऑनलाइन अर्ज कुठे व कसा करायचा ?

महा योजनादूत या पदासाठी खालील प्रमाणे अर्ज हा करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरती लिंक दिली आहे. त्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज हा करायचं आहे .

वरील लिंक वरती क्लिक करून तुम्ही योजना दूत या पदासाठी ऑनलाइन अर्ज हा करायचा आहे . त्याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

सर्वात आधी https://mahayojanadoot.org/ या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्यायची आहे . याची स्क्रीन तुम्हाला खालील प्रमाणे दिसणार आहे .

त्या पुढे तुम्हाला नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करून तुमची नोंदणी ही करायची आहे . नोंदणी करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. खाली तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून नवीन नोंदणी ही करायची आहे.

त्या पुढे तुम्हाला नवीन झाल्यावर तुमचा जीमेल आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करायचे आहे . त्याची स्क्रीन ही तुम्हाला खालील प्रमाणे दिसणार आहे. येथे तुम्हाला खालील स्क्रीन ही दिसणार आहे.

वरील फॉर्म मध्ये तुम्हाला सर्व माहिती ही नीट भरायची आहे . त्या नंतर तुम्हाला save या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला कोणत्या गावामध्ये काम करायचे आहे . ते गांव निवडायचे आहे. अश्या प्रकारे तुम्ही अर्ज हा करू शकणार आहात .

या योजनेची अधिक माहिती पाहिजे असल्यास अधिकृत संकेत स्थळ नक्की पहा . सर्व अपडेट्स साठी नक्की आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा.